About Moot Court

Moot Court is a vital component of legal education that simulates real courtroom proceedings, allowing students to engage in hypothetical legal cases. Participants. research case law, prepare legal briefs, and present oral arguments before a panel of judges, honing their advocacy skills and understanding of legal procedures. This experiential learning not only enhances critical thinking and public speaking abilities but also fosters teamwork and legal reasoning, preparing students for their future careers in law. Ultimately, Moot Court is an invaluable opportunity for aspiring lawyers to practice and refine their skills in a supportive environment

National Level Competition

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटसच्या जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संपन्न जाधवर विधी महाविद्यालयाच्या वतीने पहिली राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धा : अ‍ॅड. डाॅ. राजेंद्र अनभुले आणि अ‍ॅड. विपुल दुशिंग यांचा विशेष सन्मान

पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या जाधवर विधी महाविद्यालय आणि अ‍ॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या नऱ्हे शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. डाॅ. राजेंद्र अनभुले आणि अ‍ॅड. विपुल दुशिंग यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. यावेळी न्यायमूर्ती रामेश्वर जटाले, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, अ‍ॅड. शीतल पोटले, यावेळी उपस्थित होते.

विजेत्याला रुपये ३५ हजार आणि चषक, उपविजेत्याला रुपये २० हजार आणि चषक, बेस्ट मेमोरियल पुरस्कार रुपये १५ हजार आणि चषक, बेस्ट स्पीकर रुपये १० हजार आणि चषक, बेस्ट रिसर्चर रुपये ५ हजार आणि चषक, बेस्ट स्पीकर(प्रिलिम्स) रुपये ५ हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. प्रा.डाॅ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने स्थापन करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे विधी शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालायाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. इंग्रजी सोबतच मराठी माध्यमातील मूट कोर्ट स्पर्धा पुढील वर्षापासून आम्ही घेणार आहोत. या स्पर्धेचे रोख पारितोषिक देखील इंग्रजीपेक्षा अधिक असेल , जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतील.